
जगातील सर्वात मोठय़ा टेक ब्रँडपैकी एक असलेल्या अॅपलने ‘आयफोन 17’ ही स्मार्टफोन सीरिज लाँच केली आहे. या सीरिजमध्ये आयफोन 17, आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स या मॉडेल्सचा समावेश आहे.
कंपनीने आज नव्या डिव्हाइसेसचे अनावरण केले. नवीन आयफोन सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरच्या बाबतीत बराच अद्ययावत आहे. ‘आयफोन 17’चे हँडसेट फिक्कट जांभळा, फिक्कट निळा, काळा, पांढरा आणि पिवळा अशा पाच रंगांमध्ये उपलब्ध असेल. यात 6.3 इंचाचा डिस्प्ले, 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट प्रोमोशन सपोर्ट आणि 3000 निट्स पीक ब्राइटनेस आहे. आयफोनच्या नव्या सीरिजमधील फोनची किंमत 71 हजारांपासून ते 1 लाख 5 हजारांपर्यंत आहे.