
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे उजेड आणि परिसरातील शिवारात मांजरा नदीचे रौद्र रूप पाहण्यास मिळत आहे. नदीपात्राबाहेर पाणी शेत शिवारातून वाहात आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसुन येते आहे.
सततच्या होणाऱ्या पावसाने मांजरा नदीने रौद्र रूप धारण केले आहे . नदीचे पाणी पात्राच्या बाहेर पडले आहे. नदीकाठच्या शेतातील सोयाबीन, मूग पिकामधून पाणी वाहत आहे. सद्यस्थिती पाहता यापेक्षाही प्रचंड पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे . त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. शेतीचे मोठे नुकसान झालेले दिसुन येते आहे.