लगीन घटिका आली समीप… रश्मिका-विजय उद्या लग्नबंधनात अडकणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा दोघांचा प्रेमाचा प्रवास आता सात फेऱ्यांकडे जात आहे. या दोघांनीही पहिल्यांदाच लग्नाला अधिकृतपणे दुजोरा दिला आहे. रश्मिकाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली असून यात अधिकृतपणे ‘द वेडिंग ऑफ विरोश’चा उल्लेख केला आहे. लग्न सोहळ्यासाठी हे दोघेही उदयपूरला पोहोचले आहेत. या दोघेही उद्या गुरुवारी लग्नबंधनात अडकणार आहेत.

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा लग्नसोहळा उदयपूरला होत आहे. बऱयाच काळापासून सुरू असलेल्या लग्नाच्या चर्चांवर आता या जोडप्याने स्वतः शिक्कामोर्तब केले आहे. रश्मिका आणि विजयने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘आमच्या प्रियजनांनो, आम्ही कोणतीही योजना बनवण्यापूर्वी किंवा स्वतःसाठी काही ठरवण्यापूर्वी तुम्ही आमच्यासोबत होता. तुम्ही आम्हाला खूप प्रेमाने ‘विरोश’ हे नाव दिले. म्हणूनच आज आम्ही मनापासून आमच्या या मिलनाला तुमच्या सन्मानार्थ एक नाव देत आहोत. आम्ही याला ‘विरोशचे लग्न’ असे नाव देत आहोत. आम्हाला इतके प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद! तुम्ही नेहमीच आमचा एक भाग राहाल. खूप प्रेम,’ असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.