
पश्चिम बंगालमध्ये जगातील सर्वात वृद्ध वाघाचे सोमवारी निधन झाले. राजा असे या वाघाचे नाव आहे. त्याचे वय 25 वर्षे, 10 महिने होते. पश्चिम बंगालच्या अलीपुरद्वारच्या टायगर पुनर्वसन केंद्रात वाघाला ठेवण्यात आले होते.
राजा वाघ 2006पासून जल्दपारा येथील रेस्क्यू सेंटरमध्ये होता. सुंदरबनातील मातला नदीत पोहताना मगरीने राजावर हल्ला केला होता. हल्ल्यात मगरीने वाघाचा पाय खाल्ल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर राजाचे प्राण वाचवण्यात यश आले होते.






















































