
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षानिमित्त प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात 26 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता नाटय़ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सरफोजीराजे भोसले भरतनाटय़ ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटरच्या वतीने सादर करण्यात येणार आहे. कार्यक्रमात अहिल्यादेवींच्या जीवनातील विविध टप्प्यांचे नाटय़-नृत्य-संगीत रूपांतर सादर करण्यात येणार असून, त्याचे संहितालेखन विवेक आपटे व सुभाष सैगल, संगीत अजित परब, नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे आणि निवेदन हरीश भिमानी यांचे आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात ऐतिहासिक संदर्भांसह नाटय़, संगीत, नृत्याचा समन्वय असेल. विविध सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकार, अभ्यासक, विद्यार्थी आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत.