हडपसरमध्ये घरफोडी; एक तोळा सोने, 15 तोळे चांदीचे दागिने चोरीला

मुलाच्या साखरपुड्यानिमित्त कोंढवा परिसरात गेलेल्या कुटूंबाच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक तोळा सोन्याच्या दागिन्यांसह 15 तोळे चांदीचे दागिने चोरुन नेल्याची घटना हडपसरमधील जुनी म्हाडा कॉलनी येथे घडली. याप्रकरणी इक्बाल पिर महंमद (वय 48) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इक्बाल यांच्या मुलाचा साखरपुड्याचा कार्यक्रम 18 ते 20 ऑक्टोबर कालावधीत होता. त्यामुळे ते घर बंद करुन कुटूंबियासह कोंढवा परिसरात गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून एक तोळा सोन्याच्या दागिन्यांसह 15 तोळे चांदीचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी हडपसर पोलीस तपास करीत आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या