कोपरगावात मोटू-पतलूच्या जोडीने ट्रकचालकाला लुटले; गुन्हा दाखल

3994

नगर-मनमाड हायवेवर मारुती सुझुकी शोरुम समोर शनिवारी पहाटे 5. 45 वाजता उभ्या असलेल्या ट्रकमधील मालक,चालक आणि क्लिनरला शस्त्राचा धाक दाखवून मोटू-पतलूच्या जोडीने लुटल्याची घटना घडली आहे. त्यांच्यासह आणखीएकजण होता. त्या तिघांना ट्रकमालक, चालक आणि क्लिनरला शस्त्राचा धाक दाखवून 15 हजार रुपये लुटले आहेत. कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फरशीची वाहतूक करणारा एक ट्रक कोपरगाव येथील अनुपभाई पटेल यांच्याकडे फरशी पोहचवण्यासाठी आला होता. रात्र झाल्यामुळे आणि वाढत्या थंडीमुळे त्यांना नेमके ठिकाण सापडत नव्हते. त्यामुळे शनिवारी नगर-मनमाड हायवेवर मारुती सुझुकी शोरुमसमोर त्यांनी ट्रक उभा केला. त्यानंतर आतून दरवाजा बंद करून ट्रकमालक बाळासाहेब चांगदेव शिंदे (वय 44,रा. धोत्रा ता. कोपरगाव), चालक निवृत्ती नवनाथ जगदाळे (रा.जानेफळ, ता.वैजापूर) आणि क्लिनर संतोष कचरू जाधव (रा. धोत्रा, ता.कोपरगाव) असे तिघे आत बसले होते. तेव्हा एक जाडा बुटका (वय 27 ते 30) व दुसरा सडपातळ (वय 25 ते 27) हे दोघे आत शिरले. त्यांचा तिसरा साथीदार (वय 25 ते 27) शस्त्र हातात घेऊन दारात उभा होता. आत आलेल्या दोघांनी शिवीगाळ करत शस्त्राचा धाक दाखवून ट्रकमालक बाळासाहेब शिंदे यांच्या खिशातील दोन हजाराच्या 7 नोटा असे 14,000 हजार रुपये व क्लीनरच्या खिशातील पाचशेच्या दोन नोटा असे एक हजार रुपये त्यांना चोरले. कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात ट्रक मालक बाळासाहेब शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यावरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास स.पो.नी. बोरसे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या