लातूरमधील शिवणखेड येथे घर फोडले; 1 लाख 90 हजारांचा ऐवज लांबवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यातील मौजे शिवणखेड येथे अज्ञात चोरट्यांनी घर फोडल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी 1 लाख 85 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिने व 5000 रुपये रोख रक्कम असा एकूण 1,90,500 रुपयांचा ऐवज चोरत पोबारा केला आहे. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात रमेश मल्लिकार्जुन सोळुंके (रा. शिवणखेड) यांनी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, तक्रारदार आणि त्यांच्या घरातील कुटुंबिय झोपले असताना अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून घरातील 4 तोळे 200 ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत अंदाजे 1,85,500 रुपये) व 5000 रोख रक्कम असा एकूण 1,90,500 रुपयांचा ऐवज पळवला. अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गौंड करत आहेत.