मातोळा येथे घर फोडले; एक लाखाचा ऐवज लांबवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

औसा तालुक्यातील मौजे मातोळा येथे चोरट्यांनी घर फोडले. रोख रक्कम आणि सोन्याचे दीड तोळ्याचे दागिने पळवण्यात आले. या चोरी प्रकरणी भादा पोलीस ठाण्यात महादेव विश्वनाथ सूर्यवंशी यांनी तक्रार दिली आहे.

तक्रारीत नमूद केले आहे की, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे लोखंडी गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटातील रोख रक्कम 40 हजार रुपये आणि दीड तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण( किंमत अंदाजे 30 हजार रुपये) असा लाखभर रुपयांचा ऐवज पळवण्यात आला. अज्ञात व्यक्तीविरुध्द या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कर्मचारी वाडकर हे करीत आहेत.