उदगीर येथे आडत दुकान फोडले; एक लाखाचा मुद्देमाल लांबवला

उदगीर शहरातील आडत मार्केटमधील आडत दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. रोख 89 हजार व सोन्या-चांदीची नाणी असा 1 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला. या चोरी प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात संभाजी ज्ञानोबा घोगरे यांनी तक्रार दाखल केली. उदगीर आडत मार्केटमधील गाळा नं. 36 मध्ये असणारे फिर्यादीचे आडत दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. दुकानातील लोखंडी कपाटात ठेवलेले 89 हजार रुपये, 20 चांदीचे नाणे ( अंदाजे किंमत 7000रुपये) व तीन ग्रॅमचे सोन्याचे नाणे ( अंदाजे किंमत 10,000 रुपये) असा 1 लाख 6 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या