
सामना प्रतिनिधी । वसमत
बँकेतून पैसे उचलून चहा पिण्यासाठी थांबलेल्या मुख्याध्यापकाच्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी दीड लाख रुपये पळवल्याची घटना सोमवारी सकाळी 11:30 वाजता घडली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसा, सोमवारी मुख्याध्यापक खंडु विठ्ठलराव हाळदे ( राजश्री शाहू महाराज निवासी अपंग विद्यालय वसमत) हे व त्यांचा मुलगा असे दोघेही संस्थेचे परीक्षण अनुदानाचे एकूण 3 लाख 87 हजार 974 रुपये बँकेतून उचलून अल्टो कार क्रमांक एम.एच 26/ 3180 ने सकाळी 11:30 च्या सुमारास नवीन बस स्टँड येथे येऊन थांबले. चहा पिण्यासाठी श्रीनाथ हॉटेल समोर कार लावून हॉटेलमध्ये चहा पीत असताना अज्ञात चोरट्याने कारची ड्रायवर साईड काच फोडून बैग मध्ये ठेवलेले 1 लाख 50 हजार रुपये चोरून नेले. या प्रकरणी खंडू हाळदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 332/2018 कलम 379 प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास आणि पो.नि रवींद्रसिंग धुन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सय्यद आजम हे करीत आहेत.


































































