
पिवळ्या दातांमुळे अनेकदा आपल्याला लाजिरवाणे वाटू लागते. खासकरुन चारचौघात गेल्यावर, तर पिवळ्या दातांमुळे आपल्याला चेष्ठेला सामोरे जावे लागते. दातांवरील पिवळेपणा अगदी सहजशक्य दूर करता येईल. फक्त काही गोष्टी आपण नित्यनियमाने करायला हव्यात. तुमचे दात पिवळे दिसत असतील तर, लाज वाटणे स्वाभाविक आहे. बाजारात अनेक महागडे टूथपेस्ट उपलब्ध आहेत. दात पांढरेशुभ्र करण्याची खोटी वचनं देणाऱ्या अनेक जाहिराती आपण आजूबाजूला पाहतो. परंतु बरेचदा फक्त पैसा खर्च होतो, त्याचा परीणाम मात्र काहीच होत नाही. म्हणूनच पिवळ्या दातांवर घरगुती उपाय हाच सर्वात रामबाण उपाय ठरतो.
पिवळ्या दातांवर घरगुती उपाय
मीठ आणि बेकिंग सोडा
बेकिंग सोडा सौम्य एक्सफोलिएटर म्हणून काम करतो आणि दातांच्या पृष्ठभागावरील पिवळेपणा किंवा डाग काढून टाकतो. मीठ त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म वाढवते.
अर्धा चमचा मीठ घ्या आणि त्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा घाला
थोडे पाणी घालून पेस्ट बनवा
या पेस्टने ब्रशच्या मदतीने 2 मिनिटे दात घासा.
आठवड्यातून दोनदा हे करा.
लिंबू आणि मीठ
लिंबूमध्ये नैसर्गिक ब्लिचिंग घटक असतात जे दातांचा पिवळापणा कमी करण्यास मदत करतात.
चिमूटभर मीठात 5 थेंब लिंबाचा रस घाला
बोटांच्या मदतीने हे मिश्रण दातांवर घासून घ्या
1 मिनिटानंतर स्वच्छ धुवा.
आठवड्यातून फक्त एकदाच करा.
मोहरीचे तेल आणि मीठअर्धा चमचा मीठ घ्या आणि 4 थेंब मोहरीचे तेल घाला.
बोटांनी या मिश्रणाने दात हलकेच मालिश करा.
दररोज सकाळी हा उपाय करा.