लोकलच्या धडकेत चोरट्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

प्रवाशाचा मोबाईल चोरून पळालेल्या चोरटय़ाचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाला आहे. आरिफ आयुशुद्दीन शेख असे मृताचे नाव आहे. तक्रारदार हे घाटकोपर येथे राहतात. मंगळवारी वाशी येथून घाटकोपरला जाण्यासाठी त्यांनी लोकल पकडली. फर्स्ट क्लासमधून प्रवास करत असताना त्यांचा अज्ञात चोरटय़ाने मोबाईल चोरला.

तक्रारदाराला जाग आली तेव्हा खिशात मोबाईल नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल केला. त्याचदरम्यान रे रोड आणि कॉटनग्रीन स्थानकांदरम्यान लोकलच्या धडकेत एक जण जखमी झाल्याची माहिती पोलीस शिपाई सोनावणे यांना मिळाली. जखमीला जे. जे. रुग्णालयात नेले. तेथे त्याचा मृत्यू झाला. त्याच्या खिशात पॉकेट आणि आयफोन पोलिसांना सापडला. आरिफकडे सापडलेला आयफोन तक्रारदाराचा असल्याचे उघड झाले.