चोरट्यांनी दोन किलो सोने-चांदी पळवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानमध्ये चोरट्यांनी घराची खिडकी तोडून घरात प्रवेश मिळवत कोट्यवधी रुपयांच्या सोन्याचांदीवर डल्ला मारला. चोरटे एक किलो सोने आणि एक किलो चांदीचे दागिने घेऊन पसार झाले. चोरी झालेल्या सोने आणि चांदीची किंमत अंदाजित पाच कोटी रुपये आहे, असे सांगितले जाते. हे घर निर्मला गोलछा यांचे आहे. त्या सध्या चेन्नईत राहतात. काही दिवसांपूर्वी त्या खिचन गावात जैन संतांचा आशीर्वाद घेण्यासाठी गावाकडे आल्या होत्या. रात्री घरात घुसून चोरांनी हे दागिने पळवले. सकाळी ही घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.