मधुमेह नियंत्रणासाठी ‘हा’ गर ठरेल बहुमोली, वाचा

सौंदर्यप्रसाधने आणि आरोग्याच्या जगात कोरफड हे एक प्रसिद्ध नाव आहे. ही कॅक्टस प्रजातीची वनस्पती आहे, जी उष्ण आणि कोरड्या हवामानात उगवली जाते. टेक्सास, न्यू मेक्सिको, ऍरिझोना आणि कॅलिफोर्नियाच्या दक्षिणेकडील सीमावर्ती प्रदेशांमध्ये याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. वर्षानुवर्षे आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी याचा वापर केला जात आहे.

चेहऱ्यावर झटपट चमक येण्यासाठी ‘या’ गोष्टींचा वापर करा, सुंदरता पाहून थक्क व्हाल

कोरफड जेल आपल्याला सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यास आणि जखमा भरण्यास मदत करते. पण तुम्हाला माहित आहे का की तुमची आवडती कुंडीतील वनस्पती आणखी अनेक फायद्यांसाठी वापरली जाऊ शकते. तेल न घालता कोरफड जेलने नाईट क्रीम बनवू शकता. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही जेलच्या मदतीने त्वचेचे रक्षण करु शकता. तसेच कोरफड जेल हे हेअर क्रीम म्हणून वापरले जाऊ शकते. यामुळे केस गळतीची समस्या टळते. म्हणजेच त्याचे इतके फायदे आहेत की, मोजायला गेले तर बोटे कमी पडतील. म्हणूनच कोरफडीला चमत्कारी वनस्पती देखील म्हणतात.

टोमॅटोचा उपयोग करून काळी वर्तुळे घालवा, वाचा

दररोज दोन चमचे कोरफडीचा रस सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. म्हणजेच याचा वापर तुम्ही मधुमेह नियंत्रणासाठी करू शकता. तुम्ही ते रसात मिसळू शकता किंवा पाण्यासोबत घेऊ शकता. ताज्या लगद्यापासून रस बनवण्याचा प्रयत्न करा, हे तुम्हाला बाजारातील रसायनांनी भरलेल्या कोरफडीच्या रसापासून वाचवेल.

सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात २ चमचे कोरफडीचा रस आणि १ चमचा आवळा रस मिसळा. ते घेतल्यानंतर सुमारे एक तास काहीही खाऊ नका. हे लिंबाच्या रसासोबतही घेता येते. कोरफड आणि आल्याचा चहा बनवून पिऊ शकता. यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होईल.

मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी वाचा आयुर्वेदातील महत्त्वाच्या टिप्स

आरोग्य आपल्या यकृताच्या निरोगी कार्यावर अवलंबून असते. कोरफडीचा रस हा तुमचे यकृत निरोगी ठेवण्याचा उत्तम मार्ग आहे. याचे कारण असे की जेव्हा तुमचे शरीर पुरेसे पोषण आणि हायड्रेटेड असते तेव्हा यकृत उत्तम प्रकारे कार्य करते. हायड्रेटिंग आणि फायटोन्यूट्रिएंट्सने समृद्ध, कोरफड रस यकृतासाठी एक आदर्श पेय मानले जाते.