
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होते, पण भाजपने षड्यंत्र करून ते पाडले. यासाठी पेंद्र सरकारनेही जोर लावून अनेक आमदारांच्या मागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या चौकशांचा ससेमिरा लावला, खोटय़ा तक्रारीत फसवण्यात आले. ब्लॅकमेल करून भाजपने महाराष्ट्रातील सत्ता बळकावली. महाराष्ट्रातील सरकार हे चोरांचे सरकार आहे, असा घणाघाती हल्ला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
काँग्रेस स्थापना दिनाच्या निमित्ताने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी भाजपच्या पह्डापह्डीच्या राजकारणाचा समाचार घेतला. आज भाजपकडे तेच लोक आहेत ज्यांच्यावर भाजपनेच भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांच्याकडे एक वॉशिंग मशीन आहे, त्यात या भ्रष्ट लोकांना घालून ते स्वच्छ करतात. लोकांना घाबरवून त्यांनी महाराष्ट्रात सत्ता मिळवली, असे खरगे म्हणाले.
मुंबई काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांचा सत्कार करण्यात आला. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष आमदार भाई जगताप, चरणजित सप्रा उपस्थित होते.

























































