
आपला आहार आरोग्यपूर्ण कसा राहील याकडे आपण नेटाने लक्ष द्यायला हवे. अधिक पोषक तत्त्वे असलेल्या पदार्थांचा आपल्या आहारात अधिकाधिक समावेश करायलाच हवा. सध्याच्या घडीला हिंदुस्थानात मधुमेहाचे रुग्ण हे मोठ्या संख्येने वाढू लागले आहेत. मधुमेहामुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परीणाम होण्यास सुरुवात होते.
डोळ्याखालील काळी वर्तुळे आता होतील गायब, फक्त दिवसातून दोनदा हा उपाय करुन बघा
अलीकडे ओट्सच्या पिठापासून बनवलेली भाकरी खाण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. ओट्समुळे आपल्या आहाराचे निरोगी आहारामध्ये रूपांतर होते. केवळ इतकेच नाही तर इतर धान्यांपेक्षा ओट्स अधिक फायदेशीर आहे.
ओट्समध्ये कॅलरी, प्रोटीन, फायबर यांचा समावेश प्रामुख्याने असतो. शिवाय ओट्स हे ग्लूटेन फ्रीसुद्धा असतात. त्यामुळेच विविध व्याधींपासून सुटका मिळवण्यासाठी ओट्सचे सेवन उपयुक्त ठरते.
दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी हे बाॅडी मास्क आहेत सर्वात उत्तम, जाणून घ्या
ओट्सच्या पिठामध्ये अतिशय गुणकारी फायबर आहे. त्यामुळेच ओट्सचे पीठ अधिक स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर असते.
ओट्समुळे रक्तामधील साखरेवरही नियंत्रण ठेवता येते. खासकरून मधुमेहींसाठी ओट्स खाणे हे वरदानच आहे. ओट्समुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. ओट्समध्ये व्हिटॅमिन बी, अँटीऑक्सीडेंट, फायबर, डायटरी फायबर आणि मिनरल्स असते. हे सर्व घटक आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.
























































