
सांधेदुखी, गॅस, बद्धकोष्ठता आणि शरीरावर येणारी सूज ही खूप सामान्य समस्या बनत आहेत. बरेच लोक त्यापासून मुक्त होण्यासाठी औषधे घेतात, तर त्याचा सोपा इलाज तुमच्या स्वयंपाकघरातच उपलब्ध आहे. आयुर्वेदात जावित्रीची महत्त्वाची भूमिका आहे. जावित्री हा केवळ स्वयंपाकघरातील मसाला नाही तर त्याचे औषधी गुणधर्म अनेक आजारांमध्ये संजीवनीसारखे असल्याचेही म्हटले जाते.
डायबेटीजच्या रुग्णांसाठी ‘हे’ दाणे संजीवनीपेक्षा कमी नाहीत, वाचा
जावित्रीमध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल घटक आढळतात, जे शरीराला आतून निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आणि प्रभावी आहे. जावित्रीचा वापर पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर मानला जातो. यामुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता, गॅस आणि पोट फुगणे यासारख्या समस्यांमध्ये आराम मिळतो. तसेचे याचे नियमित सेवन केल्याने भूक सुधारते. पचनसंस्था मजबूत होते. जावित्री आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.
वारंवार त्वचेशी संबंधित समस्या येत असतील तर जावित्रीचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. ते त्वचेचे डाग आणि मुरुमे कमी करते. त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचा स्वच्छ करतात आणि नैसर्गिक चमक देतात.
शिळे अन्न पुन्हा गरम करुन खाताय, मग आजच या गोष्टी करणे थांबवा
सांधेदुखी आणि सूज असलेल्या लोकांसाठी देखील जावित्री फायदेशीर आहे. अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म सांधेदुखी कमी करू शकतात. जावित्री शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास देखील मदत करते. त्यात अँटीऑक्सिडंट घटक असतात, जे शरीराला रोगांशी लढण्याची शक्ती देतात. ते मानसिक ताण आणि चिंता कमी करण्यास देखील सक्षम आहे.
जावित्री साखरेच्या रुग्णांसाठीही फायदेशीर ठरू शकते. त्यात मधुमेहविरोधी गुणधर्म आहेत, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. तसेच डिटॉक्सिफायिंग आणि किडनी निरोगी ठेवण्यासाठी रामबाण उपाय देखील ठरू शकते.
शाकाहारींसाठी प्रथिनांचा खजिना आहे ‘ही’ डाळ, वाचा याचे आरोग्यवर्धक फायदे
गर्भवती महिला आणि ऍलर्जी असलेल्या लोकांनी जावित्रीचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही परिस्थितीत, जावित्री आरोग्यासाठी हानिकारक देखील असू शकते. म्हणून, योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने त्याचे सेवन करा आणि केवळ आयुर्वेद तज्ञच याबद्दल माहिती देऊ शकतात.