
बेंगळुरूमध्ये कर्नाटकची अधिकृत भाषा कन्नडवरून वाद निर्माण झाला आहे. येथे एका एसबीआय बँकेच्या व्यवस्थापक आणि ग्राहकांमध्ये कन्नडमध्ये बोलण्यावरून मोठा वाद झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसबीआय बँकेचा व्यवस्थापक आपल्या ग्राहकांसोबत हिंदी भाषेत संभाषण करत होता. मात्र, हिंदी भाषेत बोलणं एका ग्राहकाला खटकल्यामुळे त्यांने व्यवस्थापकाला कन्नडमध्ये बोलण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. मी हिंदुस्थानात राहतो आणि मी हिंदीतूनच बोलणार असा हट्ट एसबीआय बँकेच्या व्यवस्थापकाचा होता. मात्र, हे कर्नाटक आहे आणि कर्नाटकची अधिकृत भाषा कन्नड आहे. त्यामुळे तुम्हाला कन्नडमध्ये बोलावं लागेल, असं त्यांनी बँक व्यवस्थापकाला सांगितलं.
दरम्यान, दोघेही आपल्या म्हणण्यावर ठाम होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.