
केसांची चांगली काळजी घेताना आपण काय करावे हे खूप महत्त्वाचे आहे. पेरू आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, तर त्याची पाने केसांना नवीन संजीवन देऊ शकतात. आपण केसांसाठी पेरूची पाने अनेक प्रकारे वापरू शकता. केसांसाठी पेरूची पाने कशी वापरायची ते जाणून घेऊया.
पेरूच्या पानांची पेस्ट लावावी. यामुळे केस मऊसूत तसेच काळेभोर देखील होतात. पेरूची काही पाने घ्या, ती नीट धुवून घ्या आणि त्याचे लहान तुकडे करा. त्यांना ब्लेंडरमध्ये घालून, थोडे पाणी घाला. जाड पेस्ट तयार होईपर्यंत मिक्सरमध्ये फिरवून घ्या. ही पेस्ट तुमच्या काही मिनिटांसाठी हलक्या हाताने सर्व केसांवर लावून मसाज करा.
बस किंवा गाडीमध्ये बसल्यावर उलट्या होत असतील तर, आजच हे उपाय करुन बघा
30-40 मिनिटांनंतर साध्या पाण्याने धुवा. केसांच्या वाढीसाठी आठवड्यातून दोनदा पेरूची पाने वापरा. पेरूच्या पानांनी केस धुवा
मूठभर पेरूची पाने घ्या आणि ती धुवा. एक लिटर पाण्यात घालून, पाणी उकळू द्या आणि 15 ते 20 मिनिटे तसेच ठेवून थंड होऊ द्या. पाणी गाळून एका नंतर या पाण्याने केस धुवावे. आता फिल्टर केलेले पाणी तुमच्या केसांवर मुळापासून केसांच्या शेवटच्या टोकापर्यंत लावावे. केसांवर हे पाणी लावून काही काळ तसेच सोडावे. त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवावे.
नारळाचे तेल, कांद्याचा रस आणि पेरूची पाने केसांवर लावणे सर्वात बेस्ट. सर्वप्रथम, मूठभर पेरूची पाने व्यवस्थित धुवून मिक्सरमध्ये वाटून घ्यावी. या पानांची जाड पेस्ट तयार होईपर्यंत पाने वाटू घ्यावी.
मध्यम आकाराचा कांदा घेऊन, त्याचे लहान तुकडे करावेत. त्यानंतर थोड्यावेळाने कांद्याचा रस काढावा. आता कांद्याच्या रसात पेरूच्या पानांची पेस्ट आणि खोबरेल तेल मिसळावे. सर्व मिश्रण एकजीव करावे. हे मिश्रण केसांवर लावावे. किमान 30 मिनिटे तसेच ठेवावे. यानंतर सौम्य शाम्पूने धुवा