
देशाच्या विकासाच्या दृष्टीने आमच्या व्हिजनसाठी यंदाआर्थिक अजेंड्यात 1) नागरिकांना संधी उपलब्ध करून देणे, 2) वाढ आणि रोजगार निर्मितीला मजबूत चालना देणे आणि 3) सर्वसावेशक आर्थिक स्थिरता मजबूत करणे या तीन गोष्टींवर यंदाचा अर्थसंकल्प केंद्रीत आहेत, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली.
अर्थसंकल्प मांडतेवेळी त्यांनी पार्श्वभूमी स्पष्ट केली. त्या म्हणाल्या रशिया-युक्रेन युद्ध आणि कोरोनानंतरही देशाची अर्थव्यवस्था उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे.
कोरोना काळात कोणाही उपाशी झोपणार नाही याची 28 महिने काळजी केंद्र सरकारनं घेतल्याचंही त्या म्हणाल्या.
“Economic agenda for our vision focuses on 1) facilitating opportunities for citizens, 2) providing strong impetus to growth and job creeation and 3) strengthening macroeconomic stability”#AmritKaalBudget
— PIB India (@PIB_India) February 1, 2023
जी20 च्या अध्यक्षतेमुळे जागतिक आर्थिक व्यवस्थेत देशाचं स्थान बळकट होण्यास मदत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
देशाची अर्थव्यवस्था जगातील 10 व्या वरून 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.




























































