चीनपासून पुढील वर्षात असलेले धोके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

अमेरिकेची गुप्तहेर संघटना डायरेक्टर नॅशनल इंटेलिजन्सने 9 एप्रिलला आपला वार्षिक रिपोर्ट अमेरिकन सिनेटसमोर ठेवला. हा रिपोर्ट म्हणतो की, चीन येणाऱया काळामध्ये त्यांच्याकडे असलेल्या सगळ्या ताकदीचा वापर करून जगावर प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. तो हिंदुस्थानमध्ये विविध प्रकारांनी अराजकता पसरवून हिंदुस्थानची आर्थिक प्रगती रोखण्याचा प्रयत्न करेल.

अमेरिकेची गुप्तहेर संघटना डायरेक्टर नॅशनल इंटेलिजन्सने 9 एप्रिलला आपला वार्षिक रिपोर्ट अमेरिकन सिनेटसमोर ठेवला. यामध्ये पुढच्या एक वर्षामध्ये अमेरिकेच्या आणि जगाच्या सुरक्षेला जे वेगवेगळे धोके निर्माण होऊ शकतात, त्याविषयी विश्लेषण केले गेले आहे. हा रिपोर्ट पुष्कळ मोठा आहे आणि जागेच्या अभावी आपण आपले लक्ष हे फक्त जे धोके हिंदुस्थानकरिता महत्त्वाचे आहेत त्यावर केंद्रित करू.

पाकिस्तानपासून निर्माण होणाऱया धोक्याविषयी जास्त बोलण्याची गरज नाही. कारण त्याला काय प्रत्युत्तर असेल हे जगजाहीर आहे, परंतु चीनपासून निर्माण होणारे धोके आणि त्याला द्यायचे प्रत्युत्तर यावर अजून जास्त अभ्यास आणि विश्लेषणाची गरज आहे. हा रिपोर्ट म्हणतो की, चीन येणाऱया काळामध्ये त्यांच्याकडे असलेल्या सगळ्या ताकदीचा वापर करून जगावर प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. चीनकडे असलेले तंत्रज्ञान, आर्थिक ताकद, सैन्याची ताकद, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांमध्ये त्यांच्याकडे असलेली विविध उपकरणे या सगळ्यांचा वापर/गैरवापर करून जगात महाशक्ती बनण्याचा प्रयत्न होईल.

तो हिंदुस्थानमध्ये विविध प्रकारांनी अराजकता पसरवून हिंदुस्थानची आर्थिक प्रगती रोखण्याचा प्रयत्न करेल. येणाऱया काळामध्ये हिंदुस्थान-चीन सीमेवर चिनी आक्रमकता वाढू शकेल. साऊथ चायना समुद्रामध्ये चीनची आक्रमकता वाढेल. चीन तैवान, जपान आणि साऊथ ईस्ट देशांच्या विरुद्धसुद्धा आक्रमक कारवाई करेल. मात्र चीनची साऊथ चायना समुद्रात साऊथ ईस्ट देशांमधील देशांच्या विरोधात, जपानच्या विरोधात होणारी कारवाई तसे म्हटले तर हिंदुस्थानकरिता फायदेशीर आहे. कारण त्यामुळे चीनचे लक्ष आणि ताकद काही काळ हिंदुस्थानपासून काढून ती इतर देशांच्या विरुद्ध वापरली जाईल.

वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन म्हणजे अणुबॉम्ब, क्षेपणास्त्र आणि इतर शस्त्र. येणाऱया काळामध्ये त्यांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे. चीनची आर्थिक ताकद प्रचंड असल्यामुळे त्यांना अशा प्रकारची महागडी शस्त्र निर्माण करणे हे सोपे असते. हिंदुस्थानने अणुबॉम्ब, क्षेपणास्त्र क्षेत्रामध्ये आपले संशोधन चालू ठेवावे आणि जेव्हा शक्य होईल त्या वेळेला शस्त्रांची संख्या आपल्याला वाढवावी लागेल. अणुयुद्धामध्ये हिंदुस्थानला आपली सेपंड स्ट्राईक पॅपाबिलिटी निर्माण करण्यावर अजून जास्त लक्ष देण्याची गरज आहे. सध्या हिंदुस्थानला कोरोनामुळे लष्करी बजेट वाढविण्याची अजिबात संधी नाही. मात्र कोरोनावर मात केल्यानंतर हिंदुस्थानला आपले लक्ष सैन्याच्या आधुनिकीकरणावर केंद्रित करावे लागेल.

स्पेस म्हणजे अंतराळातल्या लढाईमध्ये चीन वेगाने प्रगती करत आहे. पुढच्या दोन वर्षांमध्ये चीन एक लो अर्थ ऑर्बिट स्टेशन तयार करणार आहे. चीन आपल्या सॅटेलाइटच्या मदतीने जगावर लक्ष ठेवेल. चीनकडे दुसऱया देशांचे सॅटेलाइट पाडण्याची क्षमता आहे. त्यामुळे अंतराळात होऊ शकणाऱया युध्दावरसुद्धा हिंदुस्थानला लक्ष द्यावे लागेल.

हिंदुस्थाननेसुद्धा अंतराळात असलेले सॅटेलाइट पाडण्याची क्षमता ही मागच्या वर्षी दाखवून दिली होती. ही क्षमता येणाऱया काळामध्ये वाढवून आपल्याला अशा प्रकारची सॅटेलाइटविरोधी क्षेपणास्त्र सैन्यामध्ये सामील करून तैनात करावी लागतील. अर्थात त्याकरिता बजेट वाढवले पाहिजे.

याशिवाय चीन इतर देशांच्या माध्यमातून हिंदुस्थानमध्ये तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये स्टार्टअप तयार करण्याचा प्रयत्न करत होता. आता आपण अशा प्रकारच्या चीनच्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवत आहोत. थोडक्यात आपल्याला इतरांवर अवलंबून न राहता स्वतः या देशांमध्ये तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. याला अर्थात वेळ लागेल, परंतु तोपर्यंत आपल्याला इतर मित्रराष्ट्र म्हणजे अमेरिका, जपान, तैवान यांची मदत घेऊन चीनच्या तंत्रज्ञान आक्रमणाचा मुकाबला करावा लागेल.

ज्या क्षेत्रामध्ये चीन अतिशय ताकदवान आहे ते क्षेत्र म्हणजे सायबर जगत. यामध्ये चीन हॅकिंग, ट्रेड सिव्रेट, डिझाइन चोरणे क्षेत्रामध्ये एवढा पुढे आहे की, त्याने फॉर्च्यून फाईव्ह हंड्रेड कंपनीचे ट्रेड सिक्रेटसुध्दा चोरलेले आहे. आपण केवळ आपल्या देशाच्या महत्त्वाच्या संघटनांचा चीनच्या आक्रमणापासून रक्षण करण्याचा प्रयत्न करतो. आपली क्षमता त्याकरिता बऱयापैकी विकसित झाली आहे. मात्र ती केवळ स्वतःचे रक्षण करण्यापुरती आहे.

हिंदुस्थानचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल रावत यांनी म्हटले आहे की, आक्रमक सायबर ऑपरेशन्स म्हणजेच चीनच्या सायबर जगतामध्ये प्रवेश करून हॅकिंग करणे किंवा त्यांची सिव्रेट्स चोरणे यामध्ये हिंदुस्थान पुष्कळ मागे आहे. येणाऱया चार वर्षांमध्ये आम्ही चीनच्या बरोबर कॉम्पिटिशन करण्याकरिता तयार राहू. जर चीनने हिंदुस्थानच्या सायबर पद्धतीवर हल्ला केला (जसा महाराष्ट्राच्या वीज निर्मितीवर) तर आपल्याला चीनच्या सायबर जगतामध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्याची क्षमता निर्माण करावी लागेल.

चीन सगळ्या जगामध्ये आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करेल. यामध्ये ते जगाच्या मीडियाला वेगवेगळ्या पद्धतीने विकत घेत आहे. याशिवाय चीन वेगवेगळ्या देशांच्या इलेक्शन म्हणजे निवडणुकांमध्येसुद्धा हस्तक्षेप करत आहे. त्यांनी मोठय़ा प्रमाणात अमेरिकन प्रेसिडेन्शियल इलेक्शनमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणूनच या बाबीवर लक्ष ठेवून आपल्याला देशात चीनचा हस्तक्षेप थांबवावा लागेल.

येणाऱया काळामध्ये चीन विविध प्रकारांनी हिंदुस्थानवर आक्रमण करत राहील आणि त्याकरिता हिंदुस्थानला सदैव सतर्प राहून चीनच्या विविध प्रकारच्या आक्रमणाला तोंड द्यावे लागेल.

[email protected]