बिग बॉसची विजेती दीपिका कक्करला धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो सौजन्य-ट्विटर

सामना ऑनलाईन, मुंबई

बिग बॉसच्या 12 व्या पर्वाची विजेती दीपिका कक्कर हिला श्रीसंथच्या चाहत्याकडून ऑसिड हल्ल्याची धमकी येत आहे. दीपिकाच्या फॅन पेजवरून ही बाब मुंबई पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. तसेच पेजवरून मदतीची विनंतीही केली आहे. दीपिका आणि श्रीसंथ दोघे बिग बॉसच्या अंतिम फेरीत पोचले होते. श्रीसंत हा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जातो. मात्र अनपेक्षितरीत्या त्याला मात देत दीपिकाने बाजी मारली. त्यानंतर श्रीसंतच्या अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. खुद्द त्याच्या मॅनेजरनेही निकालावर नापसंती व्यक्त केली.