बेकायदा बांधकाम करणाऱ्या तीन बिल्डरांविरोधात गुन्हे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भिवंडीत बेकायदा बांधकामे करणाऱ्या तिघा जणांविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात मसुद अब्दुल अजीज फकी, विकासक मोहमंद अतर रिजवान अहमद शेख व अज्ञात कंत्राटदार यांचा समावेश आहे.

जमीनमालक व विकासकाने भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता नवीन गौरीपाडा येथील घर नं. 434 याठिकाणी दुसऱ्या मजल्याचे बांधकाम पूर्ण केले. तसेच तिसऱ्या मजल्याकरिता आर.सी.सी. स्लॅब भरण्याचे काम सुरू होते. तसेच मसुद अब्दुल अजीज फकी यांनी या ठिकाणी विनापरवाना पत्र्याचे कुंपण टाकून बांधकामाला संरक्षण देण्याचे काम केले होते.

याबाबत संबंधितांना नोटीस बजावून बांधकाम निष्काशीत करण्याचे आदेश देऊनही ते न केल्याने सहाय्यक आयुक्त शमीम अन्सारी यांनी तिघांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर सर्वांवर एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.