जालन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली; तीन दिवस संचारबंदी

479

जालना जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 115 वर पोहचली आहे. त्यामुळे 28 मे रोजीच्या मध्यरात्रीपासून 31 मेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्यानंतर शुक्रवारी सकाळपासूनच शहरातील मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट होता.

जालना जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 115 वर पोहचल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मुंबईहून परतलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. इतर जिल्ह्यातून आलेले रुग्ण ग्रामीण भागातही आढळून येत आहेत. काही जण परवानगीशिवाय जिल्ह्यात परतल्याने महसूल, आरोग्य, पोलीस विभागाला त्यांची माहिती मिळाली नाही. त्यांची तपासणी झाली नसल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ग्रामीण व शहरातील भागातील व्यापारी, भाजीपाला विक्रेत्यांनी नेहमीच्या ठिकाणी दुकाने थाटण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधीत यंत्रणेने त्यांना विक्री करण्यास मनाई केली. त्यामुळे सकाळपासून भाजी मार्केट व इतर ठिकाणच्या मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट होता.

आपली प्रतिक्रिया द्या