मालवणात सलग तिसऱ्या दिवशी मूसळधार; शहरातील रस्ते पाण्याखाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालवण तालुक्याला गेले चार दिवस पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. ग्रामीण भागात पूरस्थिती असून शेती पाण्याखाली गेली आहे. शहरातही जलमय स्थिती असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तीन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने दर दिवशी 100 मिमीचा टप्पा पार केला आहे. बुधवारी सकाळी 8 वाजता मिळालेल्या शासकीय आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात 121 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर आणखी दोन दिवस कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मागील आठवड्यात कोसळलेल्या पावसाने शेती पाण्याखाली गेली होती. त्यानंतर चार दिवस उसंत घेतलेला पाऊस पुन्हा दमदार बरसत आहे. पाण्याखाली गेलेली शेती काही भागात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. मालवण शहरातील अनेक रस्ते बुधवारी पाण्याखाली गेले. त्यामुळे पाण्यातून वाट काढत पादचारी व वाहनचालक वाट काढत होते. सखल भागातील काही दुकानातही पाणी घुसले. दुसरीकडे मच्छीमार्केट खुले होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या मत्स्यविक्रेत्या महिलांना भर पावसात मासे विक्री करावे लागले. पावसाचा जोर दिवसभर कायम होता.