भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली,  14 ठार;  मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत

महाडमधील ‘तारिक’ गार्डन इमारत दुर्घटनेत 16 जणांचा बळी गेल्याच्या घटनेला महिनापूर्ण होण्याआधीच सोमवारी भिवंडीच्या ‘जिलानी’ इमारतीतील रहिवाशांवर साखरझोपेतच काळाचा घाला पडला. धामणकर नाका येथील पटेल कंपाऊंडमधील धोकादायक जिलानी इमारत पहाटे पावणेचारच्या सुमारास पत्त्यासारखी कोसळली. या भीषण दुर्घटनेत 14 जण जागीच ठार झाले तर 20 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सात चिमुकल्यांचा समावेश आहे. ढिगाऱ्य़ाखाली अजूनही 35 जण दबल्याची भीती असून विविध बचाव पथकांचे रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होते.

 चार वर्षांचा उमेद दहा तासांनी ढिगाऱ्य़ाखालून जिवंत परतला

जिलानी अपार्टमेंट पहाटे पावणेचारला कोसळली आणि तब्बल 12 तासांनी ढिगाऱ्य़ाखालून उमेद कुरेशी या चार वर्षांच्या चिमुकल्याला एनडीआरएफच्या टीमने सुखरुप बाहेर काढले तेव्हा गणपती बाप्पा मोरयाचा एकच गजर झाला. या दुर्घटनेत उबेरचे वडील जुबेर (30), भाऊ उजेब (6) आणि बहीण फय्याज (8) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर आईचा मात्र अजूनही शोध लागलेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या