
कश्मीरमधील रामबनमध्ये राष्ट्रीय महामार्गावर लष्कराच्या ट्रकला भीषण अपघात झाला. हा ट्रक तब्बल 600 फूट खोल दरीत कोसळल्याने तीन जवानांचा मृत्यू झाला. जम्मूहून कश्मीरच्या दिशेने हा ट्रक येत होता.
अपघातानंतर तातडीने स्थानिक पोलीस, लष्कर, एसडीआरएफ आणि सिव्हिल क्यूआरटीसह रामबन येथील स्थानिक स्वयंसेवकांनी बचाव कार्य सुरू केले, मात्र अपघातात तीन जवानांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जवान गंभीर जखमी झाले. अमित कुमार, सुजीत कुमार आणि मान बहादूर अशी मृत्युमुखी पडलेल्या जवानांची नावे आहेत. जम्मूहून श्रीनगरला राष्ट्रीय महामार्ग 44 वर लष्कराच्या वाहनांचा ताफा जात होता, परंतु यातील एका ट्रकचे नियंत्रण सुटल्याने ब्रटरी चष्माजवळ सकाळी साडेअकराच्या सुमारास ट्रक खोल दरीत कोसळला. अपघातात ट्रकचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.