
संवत्सर शिंगणापूर रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या 3 व्यक्तींनी एका व्यक्तीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून बंधन बँकेच्या कलेक्शन प्रतिनिधीची 65 हजाराची रोकड असलेली बॅग चोरून नेल्याचा प्रकार गुरुवारी(30) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडला.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. संवत्सर ते शिंगणापुर जाणारे रोडवर, काटवनाजवळ, संवत्सर शिवारात विना नंबरची स्प्लेंडर दुचाकीवरून तीन व्यक्ती आल्या. त्यांनी डोळ्यात मिरची पावडर टाकत हातामधील रोकड असलेली बॅग चोरल्याचे तक्रारदार सोमीनाथ दिनकर जाधव वय- 30 वर्षं धंदा खा. नोकरी रा. लक्ष्मीनगर,कोपरगाव याने पोलिसांना सांगितले. या बॅगेत 64,500/-रु त्यात रोख रक्कम व कलेक्शनचे रजिस्टर, पावती फाडण्याचे पॉज मशिन, लोन फॉर्म इतर स्टेशनरी होती होते.
सदर तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गु. रजि. नं व कलम: 40 /2020 भादवि कलम 392 ,34 प्रमाणे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई नागरे हे तपास करीत आहे

































































