
सामना ऑनलाईन । गुमला
झारखंडमधील आमटोली जंगलात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत तीन माओवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. मृत माओवाद्यांची अद्याप ओळख पटली नसून त्यांच्याकडून दोन एके 47 व इतर समान जप्त करण्यात आले आहे.
#UPDATE Another Maoist has been killed in the encounter. Operation continues. #Jharkhand https://t.co/huBUBoz7h4
— ANI (@ANI) February 24, 2019
जंगलात माओवादी लपल्याची माहिती पोलिसांना खबर्यांमार्फत मिळाली होती. तेव्हा पोलिसांनी या ठिकाणी शोध मोहीम हाती घेतली. या शोधमोहिमेत काही माओवादी पोलिसांना दिसले. तेव्हा माओवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही स्वरक्षणार्थ गोळ्या चालवल्या आणि चकमक सुरू झाली. यात चकमकीत तीन माओवादी ठार झाले असून पोलीस त्यांच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.

























































