
जम्मू कश्मीरमध्ये अनंतनागमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. मृत दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला आहे.
अनंतनाग जिल्ह्यात पाझलपोरा भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस जेव्हा त्या भागात पोहोचले तेव्हा दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. हे दहशतवादी कुठल्या संघटनेचे होते याची माहिती अद्याप कळालेली नाही.
मृत दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला आहे. सुरक्षादलाकडून शोधमोहीम सुरू आहे. पोलिसांनी हा भागात संचारबंदी लागू केली आहे.























































