
सामना प्रतिनिधी, मुंबई
मेट्रो रेल्वेला आता प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर दरम्यानच्या मेट्रो-१ मार्गावर प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या मार्गावरील गाड्यांना डबे वाढवा अशा सूचना एमएमआरडीएने मुंबई मेट्रो वनला केल्या आहेत. सध्या चार डब्यांच्या असलेल्या मेट्रो रेल्वेच्या गाडय़ा सहा डब्यांच्या करण्यात येणार आहेत.
या मार्गावरून रोज ३.४ लाख प्रवासी प्रवास करतात. येत्या काही दिवसांत ही संख्या चार लाखांवर पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या मार्गावरील प्रवाशांच्या संख्येत १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

























































