कणकवलीत पूर्ववैमनस्यातून 3 मोटारसायकली जाळल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कणकवली नागवे रोड येथे ढेकणे यांच्या घराजवळ रस्त्यात उभ्या केलेल्या 3  मोटारसायकलींना बुधवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास आग लावण्यात आली. अज्ञात संशयिताने आग लागण्यापूर्वी घराचे दरवाजे बंद केले. हा गाडी जाळण्याचा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाल्याची चर्चा आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तपास सुरु केला आहे.

या घटनेत 2 मोटारसायकल  जळून खाक झाल्या आहेत. तर एक मोटारसायकल ढेकणे यांनी पाणी मारुन विजवण्याचे प्रयत्न केल्याने बचावली आहे. आगीत ती  मोटारसायकल किरकोळ जळाली आहे. पांडुरंग पवार यांची डिस्कवर, मोहिते यांची प्लेझर आणि पाताडे यांची पॅसिनो या तीन मोटरसायकलला बुधवारी पहाटे अज्ञातांनी आग लावली.

गाड्या उभ्या असलेल्या निमणकर यांचा  घराला बाहेरुन कडी घालण्यात आली  होती. त्यामुळे गाड्याना आग लावतेवेळी कोणी बाहेर आले तर योजना फसू नये आणि आपल्याला कोणी पकडू नये, याची खबरदारी घेण्यात आली होती. घटनेनंतर लगेचेच पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरू आहे.