उधारीवर माल दिला नाही; कुऱ्हाडीने आणि कत्तीने मारहाण, तिघांविरुध्द गुन्हा दाखल

दुकानातील माल उधार दिला नाही म्हणून कुऱ्हाडीने आणि कत्तीने तिघांनी मारहाण करून एकाला गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना अहमदपूर तालूक्यातील हिंगणगाव येथे घडली.

या प्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात हणमंत सदाशिव घुले यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यात नमुद केले आहे की, किशोर सायस आणि त्याच्यासोबत असणाऱ्या इतर दोघांनी संगनमत करुन तक्रारदाराच्या दुकानातील माल उधार न दिल्याचा राग मनात धरत भांडण उकरून काढले. किशोर सायस याने तक्रारदाराच्या डोक्यात, डाव्या बाजूला पोटावर कत्तीने मारून जखमी केले. त्याच्यासोबत असलेल्याने कुऱ्हाडीने मारहाण केली. लाथाबुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या