केरळमध्ये उन्हाचा पारा चढला, उष्माघाताने तिघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । तिरुवनंतपुरम

केरळमध्ये गेल्या तीन दिवसांत उष्माघाताने तिघांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या अधिकार्‍यांनी नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले असून पुढील दिवसांत अजून उष्णता वाढण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
ज्या तीन लोकांचा मृत्यू उष्माघाताने झाला आहे, त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठण्यात आले आहेत. शविवच्छेदनाच्या अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत राज्याच्या आठ जिल्ह्यातील तापमानात तीन ते चार डीग्रीने वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

गेल्या वर्षी केरळमध्ये पुरामुळे 400 जणांचा मृत्यू झाला होता. राज्य सरकारने उन्हापासून वाचण्यासाठी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच राज्याच्या आरोग्य मंत्री शैलजा यांनी आरोग्य अधिकार्‍यांनाही खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.