धावत्या लोकलमध्ये मारहाण करून लुटमार, तिघा आरोपींना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
रात्रीच्या सुमारास गर्दी नसल्याचा फायदा उचलत तिघांनी मिळून एका प्रवाशाला धावत्या लोकलमध्येच मारहाण करून त्याचा मोबाईल व रोकड लुटून नेली. लुटमार करून तिघे शिताफीने सटकले, पण बोरिवली रेल्वे पोलिसांनी कसून तपास करीत दोघा आरोपींना माहीममध्ये पकडले. त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल व रोकड हस्तगत केली. शंभुलाल शर्मा (46) यांना यांनी अंधेरी स्थानकात मध्यरात्री भाईंदर स्लो लोकल पकडली. लोकलने मालाड स्थानक सोडल्यानंतर तिघांनी मिळून शर्मा यांना पकडले आणि मारहाण केली. यावेळी आरोपींनी त्यांचा मोबाईल व रोख रक्कम काढून घेतली आणि बोरिवली स्थानक येताच धूम ठोकली. शर्मा यांनी बोरिवली रेल्वे पोलीस ठाणे गाठून घडल्या प्रकाराविरोधात तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक अनिल कदम, निरीक्षक नितीन लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय दर्शन पाटील व पथकाने तपास सुरू केला. आरोपी माहीम परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी माहीम गाठून मायकल कनक (22) आणि सनी शिप्रे (19) आणि आकाक्ष घोडके याला पकडले.