
मध्य प्रदेशमधील 6 मेडिकल कॉलेजमधील 3 हजार ज्युनियर डॉक्टर्संनी सामूहिक राजीनामा दिल आहे. गुरूवारी जबलरपूर उच्च न्यायालयाने डॉक्टरांचे आंदोलन बेकायदेशीर ठरवत 24 तासांच्या आत कामावर परतण्याचे आदेश दिले होते. ज्युनियर डॉक्टर्संनी आपले मानधन वाढवण्याचे आणि कुटुंबीयांचा मोफत इलाज व्हावा अशी मागणी केली होती.
मध्य प्रदेश ज्युनिय डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अरविंद मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 6 मेडिकल कॉलेजच्या 3 हजार ज्युनियर डॉक्टर्संनी राजीनामा दिला आहे. सर्व डॉक्टरांनी आपल्या कॉलेजच्या डीनकडे राजीनामा सुपुर्द केला आहे.
मिळणार्या मानधनात 24 टक्क्यांनी वाढ, मानधनात दरवर्षी 6 टक्क्यांची वाढ, कुटुंबीयांसाठी कोरोनाचा मोफत इलाज आणि आरक्षित बेड तसेच कार्यरत डॉक्टरांसाठी सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी या डॉक्टरांनी केली आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. उच्च न्यायालयाने हे आंदोलन बेकायदेशीर ठरवले आहे. त्यामुळे या निर्यणयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागू असेही डॉक्टरांनी म्हटले आहे.
मेडिकल ऑफिसर्स असोसिएशन आणि फेडरल ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे डॉ. अरविंद मीणा यांनी सांगितले. तसेच राजस्थान, बिहार, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तेलंगाणा, बिहार आणि महाराष्ट्रातील ज्युनियर डॉक्टरांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्याचे त्यांनी म्हटले.





























































