
सामना प्रतिनिधी । लातूर
औसा तालुक्यातील मौजे गोंद्री येथे महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी निळकंठ मारोती भोसले यास औसा येथील प्रमुख न्यायदंडाधिकाऱ्यांनी तीन वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
औसा तालुक्यातील गोंद्री येथून पिडीत महिला ही शेतात असताना निळकंठ भोसले तिथे आला व तू मला आवडतेस म्हणून तिचा विनयभंग केला. पिडीत महिलेने आरडाओरड केल्यामुळे तो पळून गेला. या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. औसा न्यायालयात प्रमुख न्यायदंडाधिकारी द. म. झाटे यांच्यासमोर हे प्रकरण सुनावणी आले. साक्षी पुराव्यावरुन निळकंठ मारोती भोसले यास तीन वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील व्ही.एस. शेवाळकर यांनी बाजू मांडली.































































