लोकलमध्ये महिलांची छेड काढल्यास तीन वर्षे कैद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
molestation-1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकलमध्ये महिलांची छेडछाड काढण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ती रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याचा निर्णय रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) घेतला आहे. महिलांची छेडछाड काढणाऱयांना तीन वर्षे कैदेच्या शिक्षेची तरतूद रेल्वे अधिनियमात करावी, असा प्रस्ताव आरपीएफने रेल्वे मंत्रालयाला दिला आहे.

लोकलमधील गर्दीचा फायदा घेत महिलांची छेड काढण्याची विकृती बळावली आहे. देशभरात अशा घटना रोज नोंदल्या जातात. आता त्या घडूच नयेत म्हणून कडक शिक्षेच्या तरतुदीचा प्रस्ताव हा त्याचाच एक भाग आहे. भारतीय दंड संहितेनुसार अशा गुह्यांमध्ये आरोपीला एक वर्षे कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे. आरपीएफचा नवा प्रस्ताव मंजूर झाल्यास आरोपींना तीन वर्षे खडी फोडायला जावे लागेल.

रेल्वे पोलिसांशिवाय आरोपींना पकडण्याचा अधिकारही हवा

रेल्वे पोलिसांच्या मदतीशिवाय आरोपींना पकडण्याचा अधिकारही देण्यात यावा, अशीही आरपीएफची मागणी आहे. तसे झाल्यास अशा प्रकरणांमध्ये वेगाने कारवाई करणे शक्य होणार आहे. अनेकदा आरपीएफने आरोपींना पकडले तरी रेल्वे पोलिसांकडून कारवाई होण्यास विलंब होतो, असा अनुभव आहे.