
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात जोरदार राडा झाला. बालगंधर्व मंदिरात स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम सुरू असताना राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी घुसून घोषणाबाजी केली आणि अंडी व बांगड्या फेकण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी राष्ट्रवादीच्या एका महिलेला भाजप कार्यकर्त्याने मारहाणही केली. यामुळे सभागृहात एकच गदारोळ झाला.
‘अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीची काटचाल’ या पुस्तकाचा प्रकाशनाचा कार्यक्रम बालगंधर्क रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रम सुरू असताना राष्ट्रकादीच्या कैशाली नागकडे आणि काही कार्यकर्त्यांनी बालगंधर्क रंगमंदिरात घुसून त्यांनी बाल्कनीमध्ये प्रकेश मिळवला. त्यांच्याबरोबर राष्ट्रकादीच्या इतर महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. याकेळी भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले. पोलिसांनी मध्यस्थी करत राष्ट्रकादीच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले, पण त्याचकेळी कैशाली नागकडे यांना मारहाण झाली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या घोषणाबाजीला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला.
तिरडी आंदोलन; काळे झेंडे दाखवले
गॅस सिंिंलडर दरवाढीसह वाढत्या महागाईच्या निषेधार्थ पुणे दौऱयावर आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या किरोधात राष्ट्रकादी काँग्रेसतर्फे सेनापती बापट रोड येथे आंदोलन करण्यात आले, तर काँग्रेसने बालगंधर्व रंगमंदिर येथील सावरकर भवनसमोर तिरडीकर गॅस बांधून गॅसचे तिरडी आंदोलन करत इराणी यांचा निषेध केला. काँग्रेसच्या काही महिला कार्यकर्त्यांनी सेनापती बापट रस्त्यावरील इराणी थांबलेल्या हॉटेलमध्ये घुसून त्यांना बांगडय़ा आणि चूल देण्याचा प्रयत्न केला.
मारहाणीचा आरोप
कैशाली नागकडे यांना भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रकादीच्या कार्यकर्त्यांनी केला. भाजपच्या एका भगकी टोपी घातलेल्या कार्यकर्त्याने कैशाली नागकडे यांच्याकर हात उगारल्याचा क्हिडीओ क्हायरल झाला आहे.
चले जाओ मोदी सरकार
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी इराणी यांच्या मार्गाकर काळे झेंडे दाखवत महागाईची राणी, स्मृती इराणी… स्मृती भाभी जकाब दो, बहुत हुई महागाई की मार, चले जाओ मोदी सरकार… हम सब एक है नरेंद्र मोदी फेक है आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.






























































