आईवरून शिवी दिल्याने गुप्तांगाला तार बांधून, दगडाने ठेचून हत्या

12
murder

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आईवरून शिवीगाळ केल्याने गुप्तांगाला तारेने बांधून आणि दगडाने ठेचून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार राजधानी दिल्लीत उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. आरोपीचे नाव रमेश उर्फ बिहारी असे आहे.

चौकशीदरम्यान आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मृत तरूण आणि आरोपी एकत्र नशा करत होते. हत्या झाली त्या दिवशी देखील दोघांनी गांजा पिला होता. याच दरम्यान दोघांमध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून वाद झाला आणि तरुणाने आरोपीला आईवरून शिवी दिली. याचा राग आल्याने आरोपीला त्याला दगडाने ठेचले. रागाच्या भरात बेभान झालेल्या आरोपीने तरुणाच्या गुप्तांगाला तारेने बांधून त्याचा मृतदेह ओढत आणून रेल्वे ट्रॅकवर फेकला. एवढे करूनही समाधान न झाल्याने आरोपीने त्याचे डोके दगडाने ठेचून छिन्नविछिन्न केले.

रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव रमेश असून तो बाटल्या गोळा करण्याचा काम करतो आणि नशेच्या आहारी गेला आहे. शनिवारी आरोपी आणि हत्या झालेल्या तरुणांमध्ये नशेमध्ये असताना वाद झाला. याच वादातून आरोपीने तरुणाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर टाकला. रेल्वे ट्रॅकवर रक्ताने माखलेले दगड मिळाले आहेत. हत्या झालेल्या तरुणाची ओळख अजून पटली नसून पोलीस तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या