चंद्रपूरमध्ये बछड्याचा मृत्यू, कारण अस्पष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर मधील गोंडपिंपरी तालुक्यातील कोठारी रेंजमध्ये बामणी इथं एका शेतात वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. बामणी गावालगत हे शेत असून उभ्या पिकांत हा बछडा मृतावस्थेत पडून असल्याचं सकाळी गावकऱ्यांच्या लक्षात आलं. वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून, पोस्टमार्टेमसाठी शव नेण्यात आलं. या बछड्याचा मृत्यू नेमका कशामुळं झाला, हे अद्याप कळू शकलेलं नाही. हा बछडा साधारणपणे वर्षभराचा असल्याचं सांगितलं जातं. या बछड्याच्या मृत्यूमुळं वनविभाग चांगलाच हादरला आहे.