… म्हणून टायगर श्रॉफ म्हणतोय, मी तर गरिबांचा ऋतिक रोशन!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूडचा सुपरडान्सर आणि लाखो तरुणींचा प्राण ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ लवकरच आगामी चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहे. चित्रपटनगरीमध्ये दोन्ही अभिनेत्यांना उत्तम डान्सर म्हणून ओळखले जाते, त्यामुळे चाहत्यांसाठी ही पर्वणीच असणार आहे. ‘YRF’च्या आगामी चित्रपटामध्ये दोघे एकत्र दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाचे नाव सोर आलेले नाही. परंतु लवकरच ऋतिक आणि टायगर एकत्र डान्स शूट करणार आहेत.

‘हिंदुस्थान टाईम्स’शी बोलताना टायगर म्हणाला की, मी ऋतिकसोबत काम करण्यासाठी उतावळा आहे. तसेच एका बाजूला भीतीही आहे, कारण मी माझ्या हिरोसोबत काम करणार आहे. तसेच टायगर हसतहसत स्वत:ला गरिबांचा ऋतिक रोशनही म्हटले. ऋतिक रोशनसोबत काम करण्याची संधी मिळाली हा मी माझा सन्मान समजतो असेही तो म्हणाला. सध्या काही कारणास्तव डान्सचे शूटिंग पुढे ढकलण्यात आल्याचे त्याने सांगितले.