‘हा’ बॉलिवूड अभिनेता झळकणार हॉलिवूड चित्रपटात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

इरफान खान, अनिल कपूर, प्रियंका चोप्रा, दीपिका पदूकोण या कलाकरांसोबत आता आणखी बॉलिवूड अभिनेता हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. बॉलिवूडमधला अॅक्शन हिरो टायगर श्रॉफ याला एका हॉलिवूड चित्रपटाची ऑफर आली आहे.

tiger-shroff-new

हॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते लॉरेंस कासनऑफ हे नुकतेच हिंदुस्थान भेटीवर आले होते. यावेळी ते टायगर श्रॉफला भेटले. या भेटीच्या वेळी त्यांनी एका बिग बजेट चित्रपटाची चर्चा केल्याचे समजते. लॉरेंस हे बिग स्टुडीओच्या सिन कॅथेरिने डेरेस यांच्यासोबत बॅटमॅनची एक सिरीज तयार करणार असून त्यात टायगरला मुख्य भूमिकेत घेण्यात येणार आहे. गुलशन ग्रोवरचा मुलगा संजय ग्रोवर याने लॉरेंसला टायगरचे नाव सुचवले आहे.