
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील गोविंदपूर गावात मध्यरात्री वाघाने धुमाकूळ घालून शेतकऱ्यांच्या गोठ्यात शिरून शेळ्यांवर ताव मारल्याची घटना समोर आली आहे.
हल्ल्यात 3 शेतकऱ्यांच्या एकूण 4 शेळ्या ठार झाल्या असून एका शेळीला वाघाने तोंडात धरून नेल्याचा धक्कादायक व्हिडीओ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या व्हिडीओमध्ये वाघ शेळीला तोंडात धरून रस्त्याने जात असल्याचे चित्र स्पष्ट दिसते. या घटनेमुळे मानवी-वन्यजीव संघर्षाची भीती पुन्हा एकदा डोकावली आहे.



























































