थंडीतही टायगरची शर्टलेस पोज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता टायगर श्रॉफ म्हणजे तरुणाईच्या गळ्यातील ताईत. आपल्या भूमिकेसाठी काहीही करण्याची त्याची तयारी असते. त्याची हीच ओळख ठळक करणारे फोटोज सध्या व्हायरल होत आहेत. यात टायगर शर्टलेस उभा आहे, तेही कडाक्याच्या थंडीत. ‘गणपत’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे हे फोटो आहेत. यूकेमध्ये पडलेल्या कडाक्याच्या थंडीत टायगर चक्क शर्ट न घालता उभा असल्याचे दिसतोय. या फोटोजमध्ये बर्फ पडतानाही दिसत आहे.