टिक टॉकवर डेव्हिड वॉर्नरचा बाहुबली अवतार

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर सध्या टिक टॉकवर प्रचंड ॲक्टिव आहे. लॉकडाऊनमध्ये त्याने अनेक व्हिडिओ टिकटॉकवर अपलोड केले असून चाहत्यांची त्याला पसंती मिळत आहे. नुकताच त्याने एक व्हिडिओ शेयर केला असून त्यात डेव्हिडचा बाहुबली अवतार पाहायला मिळत आहे. या व्हिडिओत डेव्हिडने बाहुबलीचा पोशाख परिधान केला असून यात त्याची मुलगी देखील जयजयकार करताना दिसत आहे. हा व्हिडिओला प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.

यापूर्वी देखील डेव्हिड याने शेयर केलेल्या बहुतांश व्हिडिओवरून त्याचे हिंदुस्थानविषयीचे प्रेम झळकत आहे. बॉलिवूडसह तमिळ आणि तेलगू भाषेतील व्हिडिओ त्याने याआधी शेयर केले आहेत. काही दिवसांपूर्वी त्याने केलेला लुंगी डान्स देखील व्हायरल झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या