
जाचक कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शुक्रवारी टिकरी बॉर्डरवर किसान महापंचायतीला लाखो शेतकऱयांनी हजेरी लावून शक्तिप्रदर्शन केले. यावेळी एमएसपी कायद्यासह इतर मागण्यांवर निर्णय होईपर्यंत घरवापसी करणार नाही, लढा सुरूच ठेवणार, असा इशारा शेतकऱयांनी मोदी सरकारला दिला. तसेच कृषी कायदे रद्द झाल्याचा जल्लोषही साजरा करण्यात आला.
बहादुरगढच्या सेक्टर-13 मधील सात एकर जागेवर ही किसान महापंचायत आयोजित केली होती. महापंचायतीला पंजाबहून हजारो शेतकऱयांनी हजेरी लावली होती. ही महापंचायत जवळपास तीन तास चालली. यावेळी मागील वर्षभर कृषी कायद्यांविरोधात दिलेल्या लढय़ाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तसेच पेंद्र सरकारविरोधात लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. एकीकडे कृषी कायदे रद्द झाल्याचा जल्लोष साजरा करण्यात आला, तर वर्षभराच्या लढय़ादरम्यान प्राण गमावलेल्या शेतकरी बांधवांना श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली. शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महापंचायत आयोजित केली होती. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी टिकरी बॉर्डरवर सुरक्षा वाढवली असून निमलष्करी दलांच्या जवानांचाही मोठा फौजफाटा तैनात आहे.
सरकारच्या उत्तराची वाट बघतोय – उग्राहा
संयुक्त किसान मोर्चाने इतर मागण्यांबाबत लिहिलेल्या पत्रावर पेंद्र सरकारकडून अजून उत्तर आलेले नाही. सरकारचे उत्तर आले की शेतकरी घरी परततील. आम्हाला आपापल्या घरी जावेसे वाटतेय, परंतु त्याआधी सरकारच्या उत्तराची वाट बघतोय. जोपर्यंत एमएसपी कायद्यासह आमच्या इतर सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही घरवापसी करणार नाही, असा निर्धार शेतकरी नेते जोगिंदर उग्राहा यांनी यावेळी जाहीर केला.
z किसान महापंचायतीसाठी संयुक्त किसान मोर्चाच्या अनेक नेत्यांना बोलावण्यात आले होते, मात्र जोगिंदर उग्राहा यांच्याशिवाय कुठल्याच मोठय़ा नेत्याने हजेरी लावली नाही.
z गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत हजारो शेतकरी टिकरी बॉर्डरवर पोहोचले आहेत. पंजाबच्या शेतकऱयांनी 50 हून अधिक ट्रक्टर्समधून अन्नधान्य आणून बॉर्डर गाठली आहे.
z पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतरही शेतकरी गटागटाने टिकरी आणि सिंघू बॉर्डरवर पोहोचत आहेत. नव्या लढय़ाची रणनीती आखली जात आहे.


























































