लग्नात गुपचूप काढलेल्या फोटोंवरून अश्लील व्हिडीओ बनवले, टीकटॉक विकृताला अटक

1681

महिलांच्या फोटोशी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने छेडछाड करत एका तरुणाने अश्लील व्हिडीओ बनवले. हे व्हिडीओ त्याने टीकटॉकवर व्हायरल केले. या विकृताविरोधात तक्रार करण्यात आली असून या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पंकज सहानी असं या आरोपीचे नाव आहे.

हे व्हिडीओ कसे बनवले याची सगळी माहिती आरोपीने पोलिसांना दिली आहे. ही माहिती ऐकून त्यांनाही धक्का बसला. आरोपी पंकज एका लग्नात गेला होता, तिथे त्याने सुंदर दिसणाऱ्या महिलांचे गुपचूप फोटो काढले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन त्याने फोटोचे अश्लील व्हीडीयो बनवले. पंकजने हे व्हिडीओ अपलोड करण्यासाठी टीकटॉकवर एक बनावट अकाऊंट तयार केले. टीकटॉकशिवाय त्याने हे व्हिडीओ फेसबुकच्याही बनावट अकाऊंटवर अपलोड केले. जेव्हा हे व्हिडीओ व्हायरल झाले तेव्हा ज्या महिलांचे फोटो काढले त्यातील काहींनी पोलिसांत तक्रार केली असावी असं सांगितलं जात आहे. या तक्रारीच्या आधारे पंकजला पोलिसांनी अटक केली आहे.

उत्तर प्रदेशातील आजमगढचे पोलास अधीक्षक त्रिवेणी सिंह यांनी या प्रकाराबाबत बोलताना म्हटले की या प्रकरणी टीकटॉकलाही नोटीस पाठवण्यात येणार आहे. टीकटॉक अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी काय पावले उचलत आहे याचा तपशील मागवण्यात आला आहे. टीकटॉकवर आक्षेपार्ह मजकूर जाऊ नये, किंवा गुन्ह्याला प्रोत्साहन मिळेल अशा पोस्टला आळा बसावा यासाठी काय पावलं उचलण्यात आली आहेत याचा तपशील पोलिसांनी मागवला आहे. या संदर्भात टीकटॉकने उत्तर द्यावे यासाठी पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. याशिवाय पोलिसांनी सदर गुन्ह्याप्रकरणी टीकटॉकविरोधातही सायबर कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या