निवडणुकांसाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास वर्षभराची मुदतवाढ

325


राखीव जागांसाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींकडे जातवैधता प्रमाणपत्र नसले तरीही त्यांना निवडणुकीत भाग घेता येणार आहे. जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी असलेल्या अंतिम तारखेत वाढ करण्यास आज झालेल्या मंत्री परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार संबंधित अधिनियमात सुधारणा करून सध्या असलेली 30 जून 2019 ही अंतिम तारीख 30 जून 2020 करण्यात आली आहे.

राज्यातील कार्यरत जात पडताळणी समित्यांकडे मोठ्या प्रमाणावर प्रकरणे प्रलंबित आहेत. समित्यांकडे असलेला कामाचा बोजा तसेच निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात सादर होणारे अर्ज यामुळे नागरी स्थानिव संस्थांच्या निवडणुका लढकू इच्छिणार्‍या व्यक्तींना जात पडताळणी समित्यांकडून जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे यापुढे होणार्‍या निवडणुकांचे नामनिर्देशनपत्र भरताना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास देण्यात आलेल्या सकलतीचा लाभ यापुढील निवडणुकांमधील इच्छुकांना मिळणार नव्हता. त्यामुळे मुंबई महानगरपालिका अधिनियम-1888, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम-1965 मध्ये सुधारणा करून सार्कत्रिक किंवा पोटनिवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याची शेवटची तारीख 30 जून 2019 करण्यात आली होती. त्यात सुधारणा करून ती 30 जून 2020 करण्यास मान्यता देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या